Yogatil Shastriya Sanshodhane ani Menducha Vikas

Yogatil Shastriya Sanshodhane ani Menducha Vikas

Dr. Sharadchandra Bhalekar · Kaivalyadhama

Marathi · Paperback · Edition: N/A

₹500

योगाचा शास्त्रीय दृष्टीकोनातून पडताळा घेण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत. योगातील ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या प्रक्रियांचा शरीरावर आणि मनावर कसा परिणाम होतो हे बारकाईने तपासले जात आहे. यातून त्याची उपयुक्तता आणि मर्यादा स्पष्ट होत आहेत. कुणासाठी कुठल्या प्रक्रिया योग्य आहेत याचाही अभ्यास होत आहे. विशेषतः हा विषय आरोग्यशास्त्राशी अधिक जोडला जात आहे. त्यामुळे इथून पुढे निर्माण होणारे योगसाधक आणि योगशिक्षक किंवा योगगुरु हे शास्त्रीय दृष्टीकोनाने संपन्न व्हावेत हा पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे. यामुळे योगाचे शास्त्र जनमानसांत सुलभपणे प्रसारित होईल. या क्षेत्रात कुठली अंधश्रद्धा किंवा फाजील अवडंबर राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, योग हे आपल्या आरोग्याला सांभाळणारे, दीर्घायुष्य देणारे आणि जीवन अधिक आनंददायी करणारे शास्त्र म्हणून त्याचा गांभीर्याने अभ्यास होईल.

Buy Now

India's trusted online book store