Kashi - Marathi
Vineet Bajpai · TreeShade Books
इसवी सन पूर्व १६९९, आर्यावर्तातली दलदल – प्रलयाच्या महाकाय लाटा शहरांमागून शहरे गिळंकृत करत असताना, नौकेच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी अंतिम युद्ध सुरू होते. एक निर्दयी क्रूर राजा मानवजातीचे अस्तित्वच संपवू पाहतो; आणि कलियुगाची चाहूल लागते. २०१७, वाराणसी – भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ती वेळ येताच, रात्रीच्या आकाशात पवित्र नक्षत्राचा उदय झाला. एकीकडे देवाला अर्पण होणाऱ्या आहुतीचे अचानक एका भयानक राक्षस-बळीत रूपांतर होते आणि दुसरीकडे देवता एका रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या, गूढ भ्रातृसंघाचे रहस्य उलगडतो. इसवी सन ७६२, राष्ट्रकूट साम्राज्य – पवित्र नगरीतून एक रहस्यमय पाहुणा पराक्रमी पृथ्वीवल्लभाला भेटायला येतो आणि त्याच्या हाती एक प्राचीन गुपित सोपवतो. सम्राट एका दंतकथेसमान, अशक्यप्राय मोहिमेला सुरुवात करतो. २०१७, न्यूयॉर्क – अब्जाधीशांच्या सहाव्या पिढीतल्या वंशजाला ‘बिग मॅन’चा फोन येतो. ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’चे अधिपती आपला शेवटचा, प्राणघातक डाव टाकतात. मुंबईचे अंडरवर्ल्ड डॉन थेट सैतानाच्या दूतासोबत हातमिळवणी करतात. भ्रातृसंघाशी होणाऱ्या निर्णायक लढाईत विद्युतचा निभाव लागेल का? युरोपमध्ये १४व्या शतकात झालेल्या ‘काळ्या मृत्यू’मागचे भीषण सत्य काय आहे? प्रकाश आणि अंधार, सत् आणि असत्, देव आणि राक्षस यांच्यातील अंतिम युद्ध पाहण्यासाठी नक्की वाचा. विनीत यांना भारताचे जॉर्ज आर. आर. मार्टिन (गेम ऑफ थ्रोन्स) म्हणून संबोधले जात आहे. - टाइम्स ऑफ इंडिया विनीत बाजपेयी… एक उत्कृष्ट कथाकार म्हणून उदयास आले आहेत. - डीएनए
Buy NowIndia's trusted online book store